आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूची चिलार काढण्याची मागणी

0

सांगोला (प्रतिनिधी): आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर चिलारीची झाडे आहेत आषाढी वारीसाठी कर्नाटक गोवा पश्चिम महाराष्ट्रातून दररोज हजारो वारकरी पायी चालत जातात व हजारो वाहने या रोडवरून जातात रस्त्यावरील जाणा येणाऱ्या वाहनांना अडचणी ठरणाऱ्या चिलारीची झाडे तात्काळ काढावीत अशी मागणी मा .नगरसेवक सतीश सावंत यांनी केली आहे.

सांगोला पंढरपूर रस्ता हा 24 तास रहदारीचा रस्ता आहे रात्रंदिवस या रस्त्यावर वर्दळीचा आहे सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणावर चिलारीची झाडे उगवली आहेत ती झाडे मोठी झालेत वाऱ्याने रस्त्यावर येतात रहदारीला अडथळा होतो सध्या पंढरपूरला रस्त्याचे बाजूने आषाढी वारीनिमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येने पायी चालत जातात दुचाकी चारचाकी वाहने ही मोठ्या संख्येने जातात पायी चालत जाणारे वारकरी यांना या चिलारीच्या झाडांमुळे त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूची चिलार काढण्याची मागणी मा .नगरसेवक सतीश सावंत यांनी केली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here