जि.प.सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या टॅलेंट हंट स्पर्धा पंचायत समिती सांगोला शिक्षण विभाग यांच्या वतीने दि. 21 ऑक्टोबर 2024 रोजी जि .प. प्रा. शाळा पुजारवाडी ता. सांगोला येथे संपन्न झाल्या. यामध्ये जि .प. प्रा .शाळा दिघेवाडी (वाढेगाव) इ.६वी व ७वी च्या विद्यार्थिनींनी लोकनृत्य स्पर्धेमध्ये शेतकरी गीत सादर करून इयत्ता ६ ते ८ मोठ्या गटांमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या गटाची जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांना त्यांचे वर्गशिक्षक श्री. नवनाथ साळुंखे सर व श्री सुभाष आहेरकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपट मोरे सर , श्री .सुरेश पाटील सर, श्रीम. सिंधुताई पाटील मॅडम, श्री हरिश्चंद्र लवटे सर , सौ .सुनीता लोहकरे ( अंगणवाडी सेविका) , सय्यद मॅडम,सौ.उषा दिघे मॅडम यांचे सहकार्य लाभले.
तसेच कथाकथन स्पर्धेत इयत्ता ७वी ची विद्यार्थिनी कु. प्रज्योती प्रवीण दिघे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल सांगोला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब, शि.वि.अ. श्री. कुमठेकर साहेब, शि.वि.अ. श्री भंडारी साहेब , वाढेगाव केंद्रप्रमुख श्री. मल्लय्या मठपती साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रवीण हजारे, शाळा व्य.स.उपाध्यक्ष श्री संतोष वसमळे व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले. सर्व पालक, ग्रामस्थ व परिसरातून सर्व विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक