सांगोला शहराध्यक्षपदी संतोष साठे तर सचिवपदी पवन बाजारे यांची निवड
सांगोला (प्रतिनिधी) :डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सांगोला शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी शुक्रवार दिनांक 20 जून रोजी दैनिक सांगोला कार्यालयामध्ये संपन्न झाल्या आहेत. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
या पदाधिकाऱ्यांमध्ये सांगोला शहर अध्यक्ष संतोष साठे, उपाध्यक्ष चंद्रकांत ऐवळे, सचिव पवन बाजारे, कार्याध्यक्ष शुभम ऐवळे, कोषाध्यक्ष सुनील वाघमोडे , सरचिटणीस पांडुरंग ऐवळे, सहसचिव सिद्धेश्वर माने, समन्वयक नूर बागवान, खजिनदार शब्बीर मुलाणी यांची संघटनेच्या पदाधिकाऱी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या पत्रकार बांधवांना संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांच्या हस्ते पदाधिकारी निवडीचे पत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. या संघटनेच्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी व समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पत्रकार बांधव प्रयत्नशील आहेत. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्यासाठी ही संघटना काम करेल असे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी सांगितले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक