सांगोल्यामध्ये जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन

0

सांगोला (प्रतिनिधी): युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पोर्ट्स कराटे व डो असोसिएशन सोलापूर यांच्या सहकार्याने सांगोला मध्ये दि.5 व 6 ऑक्टोबर रोजी शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन होत आहे. ही स्पर्धा बंधन पॅलेस सांगोला येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळेतील कराटे स्पर्धक येणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव व तालुका क्रीडा अधिकारी दत्तात्रेय वरकड यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या स्पर्धा वय वर्षे 14, 17, 19 असे विविध वजनी गटाप्रमाणे होणार आहेत. दि 5 ऑक्टोंबर 2025 रोजी सर्व गट मुले, 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व गट मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाला सांगोल्याचे पोलीस निरीक्षक घुगे साहेब व माजी उपनगराध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धा राष्ट्रीय अ श्रेणी पंचांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. राष्ट्रीय पंच निजेन्द्र चौधरी श्रावणी वाघमारे मॅडम सुनील वाघमारे सर तसेच मयंक स्वामी, आशिष कोकरे, राजनंदिनी वाघ, सुभिक्षा इंगोले, मृणाल लांडगे, सायली गव्हाणे आदींचे सहकार्य लाभणार आहे.अशी माहिती कराटे डो असोसिएशन सोलापूर जिल्ह्याचे व सांगोला तालुक्याचे अध्यक्ष श्री जी.के.वाघमारे सरांनी दिली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here