सांगोला ( प्रतिनिधी )- वासूद ता.सांगोला येथील उद्योजक विष्णुपंत केदार यांचे सुपुत्र चि.अजय व चि.विजय यांनी वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५०००/- रुपये देणगी देऊन आपुलकीच्या सामाजिक कार्यास सहकार्य केले आहे.

अजय केदार व विजय केदार यांचा २४ वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी सामाजिक भान जपत आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला सहकार्य म्हणून ५०००/- रुपये देणगी शनिवारी दिली. आपुलकी प्रतिष्ठानला देणगी दिल्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य सुरेशकाका चौगुले, अरविंद डोंबे, दत्तात्रय नवले, डॉ. अनिल कांबळे, शंकरराव डोंबे, महादेव बोराळकर, इंजि. विकास देशपांडे, महादेव दिवटे, अतुल वाघमोडे यांच्यासह केदार बंधुचे मित्र संजोत पतंगे, ऋतुराज माने उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक




