सांगोला ( प्रतिनिधी) – सांगोला येथील श्री. युवराज मिसाळ व त्यांच्या पत्नी पुष्पलता मिसाळ यांनी लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला १५ हजार २५ रुपयांची देणगी दिली. त्याचबरोबर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य, श्री. म. सि. झिरपे सर यांनीही वाढदिवसानिमित्त आपुलकीला ५ हजार रुपये देणगी दिली.
पुष्पलता युवराज मिसाळ यांच्या “मौनामधला गंध” या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामीण साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांच्या हस्ते बुधवारी सकाळी आपुलकी प्रतिष्ठान कार्यालय, सांगोला येथे संपन्न झाले. त्यावेळी मिसाळ दांपत्याने १५ हजार २५ रुपये देणगी दिली.
तर सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे माजी सचिव तथा सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य, चैतन्य हास्य क्लब चे सदस्य झिरपे सर यांचा ८४ वा वाढदिवस हास्य क्लबच्या वतीने गुरुवारी साजरा करण्यात आला. यावेळी झिरपे सर यांनीआपुलकीला ५ हजार रुपये देणगी दिली.
प्रतिष्ठानला देणगी देऊन सामाजिक कार्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मिसाळ दांपत्य व माजी प्राचार्य झिरपे सर यांचा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक