डॉ.दत्तात्रय काळेल यांनी निर्माण केला वेगळा आदर्श; लहान बंधूचा पुण्यस्मरण कार्यक्रम केला मातोश्री वृद्धाश्रमात

0

खिलारवाडी ता. सांगोला येथील प्रोफेसर डॉ. दत्तात्रय काळेल यांनी आपले लहान बंधू स्व. युवराज मारुती काळेल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री संत तनपुरे महाराज सद्गुरु प्रसाद शिक्षण व संशोधन संस्था, पंढरपूर संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला होता.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या वृद्धाश्रमामध्ये ज्यांना मुलं-मुली सांभाळीत नाहीत किंवा घरगुती अडचणीमुळे अनेक स्त्री-पुरुष वृद्धाश्रमामध्ये राहत आहेत. त्यांच्या समवेत पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला व त्यांच्याशी हितगुज साधून त्यांना आधार दिला. कार्यक्रमानंतर सर्वांना गोड जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. व अशा प्रकारे दरवर्षी कार्यक्रम घेतला जाईल असे प्रोफेसर डॉ. दत्तात्रय काळेल यांनी जाहीर केले. याप्रसंगी व्यवस्थापक श्री. राक्षे सर, सोलापूर शहर पोलीस अंमलदार श्री. नवनाथ काळेल व श्री. हनुमंत खपाले व काळेल परिवारातील सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होता.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here