सांगोला (प्रतिनिधी) – दि- १२ मार्च रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे जेंडर सेंसिटायझेशन या समिती मार्फत “स्त्री पुरुष समानता “हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पंढरपूर कोर्टाच्या ॲड.सौ. सुकेशनी बागल (शिर्के) या उपस्थित होत्या. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. हणमंत कोळवले हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ॲड. सौ. सुकेशनी बागल(शिर्के) यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्त्री-पुरुष समानतेबाबत मार्गदर्शन करून जागृत केले. याचवेळी स्त्रियांबद्दल व पुरुषांबद्दल त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असलेले सर्व कायदे माहीत करून दिले. विद्यार्थीनींना व विद्यार्थ्यांना हे कायदे लक्षात राहण्यासाठी त्यांनी एका गीताचा वापर केला व त्या गीताद्वारे त्यांनी त्या कायद्यांचा योग्य वापर कसा व कधी करावा असे देखील स्पष्ट केले. त्यानंतर
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.हणमंत कोळवले यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि आजच्या काळामध्ये स्त्री-पुरुष समानतेची समाजाला खूप गरज आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. अश्विनी सूर्यवंशी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.सौ. प्रणाली माळी यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीच्या चेअरमन प्रा.सौ. अश्विनी सूर्यवंशी, समिती सद्स्या प्रा.कु. दिपाली गोडसे व प्रा.सौ. मीनाक्षी धुरे व संगणकशास्त्र विभागातील सर्व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक