वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात ११५ रुग्णांनी घेतला लाभ
सांगोला/प्रतिनिधीःसांगोला शहरातील नामवंत डॉ. महावीर आलदर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.डॉ. महावीर आलदर यांच्या वाढदिवसानिमित आलदर हॉस्पिटलमध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ११५ रुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. अशी माहिती डॉ.महावीर आलदर यांनी दिली.
डॉ. महावीर आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू असून शासनाच्या नियमामध्ये बसणाऱ्या पेशंटसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा पुरवली जाते.
१८ जुलै रोजी डॉ. महावीर आलदर यांच्या वाढदिवसानिमित्त बालरोग आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सन २०१९ पासून आलदर हॉस्पिटल हे सांगोला येथे रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यरत आहे. दुष्काळी तालुका व तालुक्यातील जनतेची परिस्थिती याचा विचार करून शासनाच्या मोफत आरोग्य योजना या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत. मोफत आरोग्य तपासणी व उपचार या शासनाच्या योजनेतून आजवर अनेक रुग्णांनी लाभ घेतलेला आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण आलदर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात.
डॉ. महावीर आलदर हे ग्रामीण भागातील पेशंट व आर्थिक स्थिती याचा विचार करून रुग्णांना बिलामध्ये सवलत देतात. आलदर हॉस्पिटलचे डॉ. महावीर आलद यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, मित्रपरिवार आदींनी त्यांचा सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक