सांगोला (प्रतिनिधी):- डॉ. निरंजन आनंदराव केदार (एम.डी. मेडिसिन) एक निष्णात डॉक्टर आणि तितकाच संवेदनशील माणूस…. लहानपणापासूनच कलेच्या प्रांगणात वावरल्यामुळं अंगी बाणलेली संवेदनशीलता आणि खेळाच्या मैदानातून मिळालेली शिस्त, यांचा उत्कृष्ट संगम म्हणजे डॉ. निरंजन आनंदराव केदार. सांगोला तालुक्यातील क्रांतिकारी गांव म्हणून ओळख असणाऱ्या वासुद-अकोला गांवचे डॉ. निरंजन केदार सुपुत्र आहेत, सांगोला सारख्या ग्रामीण भागांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. केदार यांचे वडील श्री. आनंदराव गणपती केदार हे रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते . श्री. आनंदाराव केदार सरांनी घराच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या जोरावर आपल्या कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारे कर्तृत्वाने गरिबीवर मात करत आपल्या तीन ही मुलांनी उच्य विद्याविभूषित केले. डॉ. निरंजन केदार हे त्यांचे द्वितीय नंबरचे चिरंजीव …. कऱ्हाडच्या श्री. सदुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिर, कराड येथे बालवाडी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पंढरपूरच्या यशवंत विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण अव्वल नंबर मिळवून पूर्ण केलं.
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेतून अत्यंत चांगल्या गुणांची आघाडी घेऊन बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि शासकीय
महाविद्यालयात वैद्यकीय डॉक्टरकीचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मार्ग सुखर झाला. बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये घेतल्यामुळे कर्मवीर आण्णांच्या जीवनपटाचा आणि प्रेरणादायी विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला.
आयुष्याच्या जडणघडणीत याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. पदवीचे उच्य शिक्षण घेण्यासाठी ते सातारच्या आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात ते डॉक्टरकीचे धडे गिरवण्यासाठी वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी कला, क्रीडा सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय या सर्वच स्तरांमध्ये आपल्या नेतृत्वसंपन्न कर्तृत्वचा ठसा उमटवण्याचा त्यांनी श्रीगणेशा केला.. डॉक्टरकीची पदवी संपादन करताचं त्यांना साताऱ्यातील डॉक्टरांच्या संघटनेने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील समाजोपयोगी काम बघून त्यांना आदर्श विद्यार्थी आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा हा पुरस्कार बहाल केला. बेळगांवच्या नामांकित के. एल.ई. विद्यापीठातून डॉक्टरकीचे पदव्युत्तर शिक्षण घेताना डॉ. निरंजन केदार यांनी परराज्यात असून देखील व आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा के. एल.ई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट पदव्युत्तर विद्यार्थी हा पुरस्कार मिळवला आणि सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला…
आरोग्य, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा गौरव झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते सांगोला तालुक्यात केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर माणुसकीच्या भावनेनं आणि सामाजिक जाणिवेतून रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा मानून ते वैद्यकीय सेवा देत आहेत. अनेकदा मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरं, रक्तदान शिबिरं, विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून ते समाजाची सेवा करत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीनं आणि उच्च दर्जाचे मोफत वैद्यकीय उपचार शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळावेत, यासाठी अहोरात्र धडपडणारे डॉक्टर म्हणून त्यांची परिसरात ख्याती आहे. कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील कबड्डी, शरीरसौष्ठव अशा खेळांमध्ये अश्वमेध आंतरराज्य आणि ऑल इंडिया आंतर विद्यापीठ स्तरावर नेतृत्व करून मैदान गाजवणारे डॉ. निरंजन केदार हे खिळाडूवृत्ती जोपासणारे ते एक यशस्वी खेळाडू तर आहेतच त्यासोबत इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन या शरीरसौष्टव (बॉडीबिल्डिंग) संघटनेचे ते राष्ट्रीय पंच म्हणून देखील काम करतात. अंगी नेतृत्वगुण असल्यामुळं समाजातील विविध वंचित घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न ते करतात. संशोधकवृत्तीच्या डॉ. निरंजन केदार यांचे अनेक रिसर्च पेपर Pubmed Scopus या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक