डॉ. विधिन कांबळे यांचे Silent Victims पुस्तक प्रकाशित 

0

सांगोला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विधिन कांबळे यांचे silent victim हे पुस्तक नव वर्ष 2025 च्या निमित्ताने महाविद्यालयाच्या आयक्यूएसी , व स्टाफ अकॅडमी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रकाशन कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले.

Silent VICTIMS- The effect of organochlorine and organophosphorus pesticide on wildlife पुस्तकाबद्दल बोलताना प्रा. डॉ. विधिन कांबळे यांनी सांगितले की, शेती व पिकासाठी आपल्या देशात मोठ्याप्रमाणावर त्यादिवशी कीटकनाशकांचा वापर केला जातो. ही पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रामुख्याने कीटकनाशकांचा वापर होत असला तरी त्याची दुष्परिणाम मानवी आरोग्याबरोबरच वन्यजीव आणि प्राण्यांच्या वरती सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असताना दिसून येते. शेतीत वापरलेल्या कीटकनाशकांचा संचय अनेक प्राण्यांच्या शरीरामध्ये विविध अवयवामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. व काहीही कारण नसताना अनेक जीव या घातक कीटकनाशकांना बळी पडत आहेत. हे डॉ. कांबळे यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. व त्यांचे अनुमान व निरीक्षण संबंधित पुस्तकात दिली आहेत म्हणूनच या पुस्तकाला बळी पडणाऱ्या जीवांना ‘Silent Victims’ असे संबोधले आहे.

हे पुस्तक बी एफ सी प पब्लिशिंग हाऊस या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रकाशित केले आहे. जगभरात बंदी असलेली आणि कीटकनाशके आणि रसायने आपल्या देशात नव्हते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ती निर्माण केली जातात अशी कीटकनाशके व रसायने मानवी आरोग्याबरोबरच वन्यजीवांना सुद्धा घातक आहेत आणि नजीकच्या काळात घटिक नाशकांचा असाच बेसुमार वापर झाला तर वन्यजीव धोक्यात येतील व निसर्गातील अन्नसाखळी संपुष्टात येऊ शकते. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून शेतीचे उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे तरच भविष्यात आपल्याला शाश्वत जीवन जगता येईल. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी बोलताना सांगितले की, कीटकनाशके ही अत्यंत घातक असून मानवी आरोग्याला धोका होऊन अनेक आजार व विकार जडू शकतात. यासाठी सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक कीटक नाशकांच वापर केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ अकॅडमीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयक्यूएसी चेअरमन डॉ. राम पवार यांनी आभार मानले. प्राणीशास्त्री विभागाच्या वतीने प्रा. डॉ विजयकुमार गाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ विधिन कांबळे यांचा सत्कार केला. महाविद्यालयाचे सर्व सहकारी प्राध्यापक व संस्था पदाधिकारी यांनी पुस्तक प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले.हे पुस्तक फ्लिपकार्ट ॲमेझॉन गुगल बुक आधी मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here