प्रतिनिधी (शशिकांत कोळी): सांगोला तालुक्यातील घेरडी गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून ओळखले जाते परंतु याच गावात घेरडी येथील एसटी स्टँड परिसरात अनेक वाहतुकीची लहदार असते आणि अशाच ठिकाणी एका कंपनीने त्यांची केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या मधूनच केबल पुरण्यासाठी चार काढली होती परंतु त्याची दुरुस्ती व्यवस्थित केली गेली नाही खडी रस्त्यावर तशीच राखली गेली आहे त्या खडीमुळे एक्सीडेंट होऊ शकतो त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुरुस्ती व्यवस्थित केली गेली नाही त्यामुळे एसटी स्टँड परिसरात धुळीचे साम्राज्य झाले असून तेथील,हॉटेल, वडापावचे, चहाचे गाडे, भाजी पाला विकणारे, व्यापारी वर्ग यांचे खुप मोठे नुकसान होत आहे.
या धुळीचा खूप त्रास होत आहे तेथे पाणी ही मारले जात नाही तसेच अनेक गावचे आसपासची खेड्यातील लोकही तिथे बाजाराच्या निमित्ताने व प्रवासाच्या निमित्ताने येत असतात त्यांनाही या धुळीचा फार त्रास होऊ लागला आहे. तेथून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनाही या धुळीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून तो रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहेत.
एसटी स्टँड परिसरातील झालेली रस्त्याची दुरावस्था वेळीच अधिकाऱ्याने लक्ष घालून दुरुस्त करावी अन्यथा घेरडी ग्रामस्थासह 1 मे 2025.पासून तीव्र आंदोलन करू
– युवक नेते बयाजी लवटे
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक