सांगोला तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना २८ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करून घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. शिधापत्रिकेमधील व्यक्तींची मुदतीत ई-केवायसी न झाल्यास शिधापत्रिकेमधून नाव वगळण्यात येणार तसेच धान्य बंद होणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीमध्ये ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे राहणार आहे. असे मत सांगोला तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
पुढे बोलताना तहसीलदार कणसे म्हणाले, सांगोला तहसील अंतर्गत जवळपास ७३ हजार ८४० रेशन कार्ड असून २ लाख ९६ हजार ५४ कार्डधारकांची संख्या आहे. यामध्ये रेशन सुरू असलेले अंत्योदय २९६५ अन्नसुरक्षा १९७२७असून एकूण ४२६९६ सध्या यांना रेशन सुरू आहे त्यांना केवायसी बंधनकारक असून करणे गरजेचे आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्नधान्य पुरविले जाते. त्यासाठी लाभार्थी
कुटुंबांना शिधापत्रिकेच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानांवर अन्नधान्य वाटप केले जाते. दरम्यान, शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. मुदतीत ई-केवायसी न केल्यास येत्या मार्चपासून संबंधित व्यक्तीचे नाव शिधापत्रिकेमधून कमी होऊन त्यांना धान्य मिळणार नाही. त्यामुळे रेशन धारकांनी आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली नाही, हे तपासणे गरजेचे आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे धान्य येत्या १ मार्चपासून बंद होणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना त्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. घरात किती सदस्य आहेत, एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्यांच्या हक्काचा शिधा मिळावा यासाठी ही ई-केवायसी केली जात आहे रेशन कार्डधारकांनी लवकरात लवकर तात्काळ ही केवायसी करावी असे पुरवठा निरीक्षक प्रियंका जाधव यांनी सांगितले.
ज्या रेशन कार्डधारकांनी ई केवायसी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने करून घ्यायला हवी. अन्यथा ज्यांची ईकेवायसी झाली नाही, त्यांचे नाव शिधापत्रिकेमधून कमी होऊन धान्य पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच मृत लोकांची नावे शिधापत्रिकेमधून संबंधितांनी कमी करून घेणे बंधनकारक आहे.
– प्रांजली गावंडे पुरवठा निरीक्षक, सांगोला
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक