ई-पीक पाहणी नोंदणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

0

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

राज्यातील अनेक जिल्ह्यांत झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेली पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम २०२५ च्या ई-पीक पाहणी नोंदणीत आलेल्या अडथळ्यांची दखल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेऊन, ई-पीक पाहणी नोंदणीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महसूल विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले असून, राज्यात खरीप हंगाम २०२५ साठी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली होती. त्यानंतर १ ऑक्टोबरपासून सहायक स्तरावरून नोंदणी सुरू करण्यात आली होती, ती मुदत २९ ऑक्टोबर होती. मात्र, नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणावर पीक नोंदणी होऊ शकली नाही. आकडेवारीनुसार, आतापर्यंत डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत राज्यातील एकूण क्षेत्रापैकी केवळ ३६.१२ टक्के पिकांचीच नोंद पूर्ण झाली आहे. पीक नोंदणी न झाल्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती, पीक विमा आणि पीक कर्ज यासारख्या महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहू नयेत, हा या मुदतवाढीमागील मुख्य उद्देश आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here