एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवार, 31 मे रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, शिक्षक मिळायच्या आयोजन करण्यात आले आहे.
लोटस हॉल छत्रपती शाहू मार्केट यार्ड रेल्वे गुडस शेजारी कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता कार्यक्रम होईल. राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हस्ते आणि राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख आरोग्यदूत भावी शिक्षक आमदार मंगेश चिवटे, ,प्रशांत साळुंखे (शिवसेना वैद्यकीय कक्षा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख), शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर मनीष काळजे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार व संस्थाचालक- शिक्षक मेळावा घेण्यात येणार असल्याचे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष, पुणे बोर्ड सदस्य,संस्थापक श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था सोलापूर आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा डॉ बापुसाहेब आडसुळ यांनी सांगितले आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी राज्यातील 50 आदर्श संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित येणार आहे यावेळी राज्यभरातून 2000 संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित राहणार आहेत पुरस्कारासाठी ज्या इच्छुक संस्था असतील त्यांनी आपले प्रस्ताव रविवार 25 मे पर्यंत प्रा डॉ बापुसाहेब आडसुळ (8530192877) या नंबर वरती व्हाट्सअप करावेत, असे आव्हान पुरस्कार समितीच्या वतीने संयोजक प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ यांच्या वतीने करण्यात येत आहेत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक