राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी (e-KYC) दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे.

आता राज्यातील पात्र महिलांना त्यांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी किंवा ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंतची वेळ मिळणार आहे.

यापूर्वी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता एक महिन्याचा अतिरिक्त कालावधी (३० एप्रिलपर्यंत) देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ‘लाडक्या बहिणींना’ आपल्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी असल्याचेही मंत्र्यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ पासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



