सावित्रीबाई फुले प्रशालेत बाप्पाला निरोप

0

सावित्रीबाई फुले प्रशाला व जुनियर कॉलेजमध्ये अनंत चतुर्दशीचा दिवस तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच भावूकतेने गणरायाला निरोप देण्यात आला .गतवर्षी गणेश प्रतिष्ठापने पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणेश फेस्टिवल चे आयोजन प्रशालेमध्ये केले जाते. सर्व विद्यार्थ्यांनी लेझीम टिपरी झांज पथक यांचे दरवर्षीप्रमाणे शानदार प्रदर्शन करत गणरायाला निरोप दिला.

याप्रसंगी प्रशालेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी सहपरिवार गणरायाची आरती केली .प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकांनी परिश्रम घेतले .त्यांच्या अभिनंदन बरोबरच पुढील वर्षी पर्यावरणाचे वाढते असंतुलन काळाची गरज विद्यार्थ्यांना याबाबत साक्षर करावे.

प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांनी छोटी मूर्ती, शाडूची मूर्ती स्थापन करावी निर्माल्य विल्हेवाट, प्लास्टिक वर बहिष्कार, ध्वनी प्रदूषण याबाबतीत उपक्रमांचे जास्तीत जास्त नियोजन करून आपले काम काम शिक्षक व विद्यार्थी यांनी अधिक चांगले करावे विद्यार्थ्यांना परिसर व गावातूनही करवून घेण्यास प्रोत्साहित करावेअसे मत प्राचार्या श्रीमती शेडसाळे यांनी व्यक्त केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here