खेड-शिवापुरच्या टोलनाक्यावरचे पाच कोटी शहाजी बापूचे? सोशल मीडियावर चर्चा

0

राज्यभरात निवडणुकीचे रंग चढत असताना पैश्याची देवाण-घेवाण देखील चर्चेचा विषय असतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या रकमेची देवाण-घेवाण आणि वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असते.

पैशाच्या देवाण-घेवाणीवर लक्ष ठेवत असतानाच पुण्यातल्या खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदीदरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांना पाच कोटी रुपयांची रक्कम एका गाडीत सापडली आहे. एमएच ४५ एएस २५२६ क्रमांकाची ही गाडी आहे. या गाडीतून ही रक्कम नेली जात होती.

सदरील गाडी सांगोला येथील नलवडे या व्यक्तीच्या नावावर असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे. या रकमेशी सत्ताधारी नेत्याच्या संबंध असल्याचंही बोललं जातंय. पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निवडणूक विभागाचे अधिकारीदेखील पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

संजय राऊत यांच्याकडून टीका

दरम्यान या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. संजय राऊत यांनी एक ट्विट करुन मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? असा प्रश्न विचारला आहे.

https://x.com/rautsanjay61/status/1848404972133879961

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here