राष्ट्रीय धावपटू अमोल आमुने यांची प्रमुख उपस्थिती; संस्थापक व उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांची माहिती
सांगोला (प्रतिनिधी): माणगंगा परिवार अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व समाज बांधवांच्या आरोग्य जागृतीसाठी ‘माणगंगा परिवार सांगोला मॅरेथॉन २०२६ चे आयोजन रविवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी पाच वाजता सांगोला क्रीडा संकुल पटांगणात करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक व विद्यमान उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांनी दिली.

या मॅरेथॉनच्या माध्यमातून समाजात आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात येणार असून यावेळी विशेष उपस्थिती म्हणून नॅशनल लेवल धावपटू श्री अमोल आमुने उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेसाठी १० किलोमीटर धावणे, ५ किलोमीटर धावणे व ३ किलोमीटर धावणे असे तीन गट तयार करण्यात आले आहेत. १० किमी धावणे (खुला गट पुरुष/महिला) या गटात प्रथम क्रमांकास ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकास ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

५ किमी धावणे (खुला गट-पुरुष/महिला) गटात प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये व तृतीय क्रमांकास १ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
तसेच ३ किमी धावणे (इयत्ता ६ वी ते १० वी मुले व मुली) या विद्यार्थ्यांसाठीच्या गटात प्रथम क्रमांकास २ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये तर तृतीय क्रमांकास १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक विजेत्यास ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नाव नोंदणी दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. ३ किलोमीटर धावणे या गट क्रमांक ३ मधील शालेय विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या वेळी आधार कार्ड व शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र स्वतःजवळ बाळगणे बंधनकारक राहणार आहे. या गटातील विद्यार्थ्यांसाठी निशुल्क नाव नोंदणी ठेवण्यात आली असून, त्यासाठी माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला मुख्य कार्यालय, MBM मॉल, पहिला मजला, फुले पेट्रोल पंपाजवळ, सांगोला येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी लागणार आहे. नाव नोंदणीसाठी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तसेच नाव नोंदणी शुल्क २०० रुपये भरल्यानंतरच नोंदणी अंतिम मानली जाणार आहे.
मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने टी-शर्ट देण्यात येणार असून, हे टी-शर्ट दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मुख्य कार्यालय ८६०५३४६९६९, अक्षय मुढे ८७९३८१५८१६, विवेक घाडगे सर ९५१८५६४९४९, सिद्धेश्वर अवताडे ९७३०४३४२९६, रोहित भोसले ९५४५४८२३२३ यांच्याशी संपर्क साधावा.

या मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्य जागृतीचा संदेश देण्याचा उद्देश असून, सांगोला शहर व परिसरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



