शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महापौर अभ्यासू नेते महेश कोठे यांचे सोमवारी (दि.13) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापुरातील झुंजार नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोठे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कोठे यांनी निवडणूक लढवली होती. यात त्यांना अपयश आले होते. आतापर्यंत त्यांनी तीनवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेचे महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवली. महापालिकेत त्यांचा मोठा दबदबा होता.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक