सांगोला (प्रतिनिधी): सांगोला येथील आलदर हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. महावीर आलदर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर दि. 18 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार असून, त्याचा उद्देश नागरिकांना आरोग्य सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे हा आहे.
या शिबिरात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना (PM-JAY) या दोन्ही प्रमुख सरकारी आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. पांढरे, केशरी आणि पिवळे रेशनकार्ड धारक या योजनांतर्गत मोफत उपचारांसाठी पात्र असतील. यासाठी सहभागी होणाऱ्यांनी आपले आयुष्मान भारत कार्ड (गोल्डन कार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे.
शिबिरात उपलब्ध असलेल्या प्रमुख सुविधा खालीलप्रमाणे आहेत:
ओपीडी सेवा पूर्णपणे मोफत असेल, रक्त तपासणी आणि एक्स-रे यांवर ५०% सूट दिली जाईल, सोनोग्राफीवर देखील ५०% सूट मिळेल, BCG आणि पोलिओ लसीकरण पूर्णपणे मोफत केले जाईल, इतर लसीकरणावर २५% सूट उपलब्ध असेल ,रुग्णाला अॅडमिशनची गरज भासल्यास, ते पूर्णपणे मोफत असेल.,आवश्यक असलेले ऑपरेशन माफक दरात केले जाईल.
हे आरोग्य शिबिर रेल्वे स्टेशन समोर, एरंडे कॉम्प्लेक्स, सांगोला, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक मो.नंबर 9029044009 या क्रमांकावर संपर्क साधावा .
तरी सांगोला शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आलदर हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक