सांगोल्यात उद्या मोफत सर्व रोग निदान महाआरोग्य तपासणी शिबिर

0

मोफत औषधे वाटपे, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  

 शिबीरास राज्याचे उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री , पालकमंत्री, पर्यटन मंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांची प्रमुख उपस्थिती

सांगोला (प्रतिनिधी):  सांगोला येथे उद्या गुरूवार दि. 10 एप्रिल 2025 रोजी सर्व रोग निदान शिबीर महाआरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबीटकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभूराजे देसाई, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, सांगोल्याचे मा. आम. अ‍ॅड.शहाजीबापू पाटील हे उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पंढरपूर विभाग प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व आरोग्यदूत फाऊंडेशनवतीने सांगोला येथे मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबीर, मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप,  मोफत औषध वाटप शिबीर, भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

उद्या गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते सायं.5 पर्यंत या वेळेत सांगोला शहरातील कडलास रोड, सांगोला महाविद्यालय येथे या महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी (मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप), कॅन्सर थर्मल टेस्टिंग, (सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञांच्या उपस्थितीत), मधुमेह तपासणी, बालरोग (लहान मुलांना मोफत औषधपचार), कान,  नाक,  घसा, जनरल मेडिसिन, एसीजी (मोफत अ‍ॅजिओग्राफी, अँजिओप्लासटी, बायपास), कडनी विकार, स्त्रियांचे आजार, जनरल सर्जरी, त्वचारोग, हृदयरोग, व्यसनमुक्तीसाठी मोफत तपासणी करून सल्ला व औषधे, दिव्यांग बांधवांकरीता मोफत मॉड्युलर हात-पाय व कॅलिपर्स यामध्ये अपंग अ‍ॅप्युटील, पोलिओग्रस्त, आणि गँगरीन ग्रस्त, डायबेटीक  फुट रूग्णांसाठी तपासणी करून मोफत देण्यात येणार आहे. या उपयुक्त अशा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येतील.

या शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबीटकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभूराजे देसाई, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, सांगोल्याचे मा. आम. अ‍ॅड.शहाजीबापू पाटील हे उपस्थित राहून शिबीराची पाहणी करून मार्गदर्शन करणार आहे.  तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाचे प्रमुख सतीशभाऊ सावंत, तालुका प्रमुख सुरज काळे, शहरप्रमुख आदित्य शेगावकर यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here