डॉ. महावीर महादेव आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राऊतमळा (माळवाडी) येथे आज दि.५ एप्रिल रोजी बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा ८० रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. महावीर आलदर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या संदर्भात रुग्णांना व त्यांच्या पालकांना आरोग्यांविषयी माहिती दिली.
तसेच यावेळी त्यांनी लहान बालकांना होणारे आजार व घेण्याची काळजी व आलदर हॉस्पिटल मधे नवजातशिशु अतिदक्षता विभाग, लहान बाळासाठी अतिदक्षता विभाग व सर्जरी विभागातील रुग्णांसाठी आलदर हॉस्पिटल हे २४ तास आपल्या सेवेत तयार आहे. गरीब व गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत सध्या योजनेअंतर्गत गरीब व गरजू रुग्णांचा भरपूर फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात माळवाडी परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घेतला. यावेळी शाळेचे उपशिक्षक मिनाक्षी बाबर, अनिता येडगे, अंगणवाडी सेविका श्रध्दा राऊत,विश्वनाथ राऊत, धनंजय राऊत, आनंदा राऊत, पॅरास्टाफ- मुस्कान मणेरी,विजय अवघडे यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते.उपस्थित शिक्षक व पालकांनी डॉ. आलदर व स्टाफचे आभार मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक