डॉ. महावीर आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलच्या वतीने श्री योगीराज सदगुरु भवानगिरी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शिरभावी येथे आज दि.१५ जून रोजी बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा ११० रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. महावीर आलदर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या संदर्भात रुग्णांना व त्यांच्या पालकांना आरोग्यांविषयी माहिती दिली.
तसेच यावेळी त्यांनी लहान बालकांना होणारे आजार व घेण्याची काळजी व आलदर हॉस्पिटल मधे नवजातशिशु अतिदक्षता विभाग, लहान बाळासाठी अतिदक्षता विभाग व सर्जरी विभागातील रुग्णांसाठी आलदर हॉस्पिटल हे २४ तास आपल्या सेवेत तयार आहे. गरीब व गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत सध्या योजनेअंतर्गत गरीब व गरजू रुग्णांचा भरपूर फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात शिरभावी गावातील व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घेतला. यावेळी डॉ. आलदर , डॉ. स्वाती खंडागळे, डॉ.बिराजदार, एजाज शेख, विजय अवघडे, मुस्कान मणेरी , मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांनी डॉ. आलदर व स्टाफचे आभार मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक