सांगोला (प्रतिनिधी): डॉक्टर बसवेश्वर पाटील यांच्या पाटील हॉस्पिटल बालरुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, बांधकाम कामगार योजना, राज्य शासन कर्मचारी योजना सुरू झाली आहे. आता नागरीकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार असून केसरी, पिवळे व पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती डॉ. बसवेश्वर पाटील यांनी दिली.
डॉक्टर बसवेश्वर पाटील यांचे सांगोला शहरात गेल्या आठ वर्षापासून सर्व सोयी सुविधा युक्त असे बालरुग्णालय सुरू आहे. डॉक्टर बसवेश्वर उत्तम पाटील हे एम.बी.बी.एस. एम.डी. बालरोग तज्ञ म्हणून काम पाहत आहेत. डी.पी.यू पुणे येथून 2010 साली एम.बी.बी.एस. चे शिक्षण पूर्ण केले असून पदव्युत्तर एम. डी. चे शिक्षण के. आय.एम. एस. कराड येथून 2014 साली पूर्ण केले आहे.
डॉक्टर बसवेश्वर उत्तम पाटील हे नवजात अत्याधुनिक जीवन समर्थन (NALS) आणि बालक अत्याधुनिक जीवन समर्थन (PALS) सर्टिफाईड डॉक्टर आहेत.
त्यानंतर पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट च्या नवले मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्षे असिस्टंट प्रोफेसर या पदावरती काम केले आहे तसेच रुग्णांची ही सेवा केली आहे. त्यानंतर ते अश्विनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, सोलापूर येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर काम करत आहेत. डॉक्टर बसवेश्वर पाटील यांनी क्लिनिको एटियॉलॉजिकल स्टडी ऑफ नीओनेट्ल् सीझर्स या विषयावरती संशोधन करून तो प्रबंध आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रसिद्ध केला आहे.
डॉक्टर बसवेश्वर पाटील यांच्या पाटील हॉस्पिटल बालरुग्णालय येथे सध्या एन.आय. सी.यु विभाग सुरू असून यामध्ये कमी दिवसाच्या, कमी वजनाच्या बाळावर, कावीळ असलेल्या, जन्मता न रडलेल्या बाळांवर उपचार केले जातात. सुसज्ज व सर्व सुविधायुक्त असा पी.आय.सी.यू हा विभाग असून यामध्ये झटके येणाऱ्या, सर्पदंश, विषबाधा, बेशुद्ध झालेल्या बाळांवरती उपचार केले जातात. वय वर्ष झिरो (0) ते अठरा(18) वर्षापर्यंत सर्व मुलांवरती उपचार तसेच सर्व प्रकारचे लसीकरण सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
पाटील हॉस्पिटल बालरुग्णालयातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व बांधकाम कामगार योजना तसेच राज्य शासन कर्मचारी योजना उपलब्ध आहेत तरी गरजू लाभार्त्यांनी या सरकारी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बसवेश्वर पाटील यांनी केले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक