सोनंद (प्रतिनिधी): बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ची पालक सभा आयोजित केली होती या सभेमध्ये महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री कोळसे पाटील ज्ञानेश्वर यांनी पाचवीच्या मुलांना ब्लेझरसह गणवेश व वह्या मोफत दिल्या आपल्या मनोगतामध्ये त्यांनी मुले सर्व गुणसंपन्न झाली पाहिजेत त्यांना जी उपलब्धी आहे त्याची किंमत कळाली पाहिजे .शारीरिक विकासाबरोबर मुले व्यवहार चतुर झाली पाहिजेत असे मत व्यक्त केले. तसेच मुलांचे लेखन वाचन इंग्रजी संभाषण यामध्ये कोणतीही कमतरता न राखण्याच्या आवाहन वजा सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या.
पालक वर्गामध्ये विजय काशीद ,अडवोकेट फडतरे, सुरेश काशीद, नारायण घाटगे, विलास कोळसे ,दत्ता दबडे भारत काशीद व बऱ्याच महिला पालक उपस्थित होत्या मुख्याध्यापिका श्रीमती शेडसाळे यांनी मुलांच्या पूर्वज्ञान चाचणीचे पेपर सादर करत पालकांकडूनही काही अपेक्षा व्यक्त केल्या . शाळेतील पोषण आहाराचा दर्जा व मुलांचे लेखन वाचन इंग्रजी संभाषण यामध्ये मागीलवर्षी प्रशालेने उत्कृष्ट काम केले आहे असे मत व्यक्त केले व इयत्ता सहावीतील मुलांची इंग्रजीची प्रात्यक्षिकेही दाखविली. शनिवारच्या आनंददायी उपक्रमामध्ये मुलांना साहित्य उपलब्धी मध्ये पालकांनी कमी पडू नये तसेच व्हाट्सअप ग्रुप वर प्रतिक्रिया,तक्रारपेटी इत्यादीचा वापर करावा असे आवाहन केले. मुलांच्या शारीरिक बौद्धिक मानसिक विकास करून घेण्यास आपण कटिबद्ध आहोत असे अभिवचन दिले व शंभर टक्के उपस्थिती चे अभिवचन घेतले.
पालक श्री सुरेश काशीद यांनी मूल्यशिक्षण चांगल्या रीतीने मिळत आहे व ते मिळालेच पाहिजे असे मत व्यक्त केले व पालक श्री विनोद फडतरे यांनी इंग्रजी जास्तीत जास्त घेतले जावे असे मत व्यक्त केले रोहिणी विलास काशीद आणि दुर्वा विजय काशिल या दोन मुलींनी आम्ही शाळेत येऊन खूप आनंदी आहोत आम्हाला शाळा खूप आवडली असे मत व्यक्त केले मुलांची भाषणाची अभिव्यक्ती पालकांना भावली. श्री तांबोळी सर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी इनामदार मॅडम कुमारी श्रुतिका काशीद यांनी केले सेवक सुहास शेडसाळे यांचे मोलाचे सेवा सहकार्य लाभले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक