हरित सांगोला’ बनवण्यासाठी वाढदिवसाला वृक्ष भेट द्या; नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांचे आवाहन

0

सांगोला: (प्रतिनिधी): “नगराध्यक्षपद हे मला सांगोलावासीयांकडून मिळालेलं आजवरचं सर्वात मोठं ‘गिफ्ट’ आहे. या पदाच्या माध्यमातून शहराचा विकास करतानाच ‘हरित सांगोला’ घडवण्याचा माझा संकल्प आहे. नागरिकांनी वाढदिवसाला हार-तुरे किंवा महागड्या भेटवस्तू देण्याऐवजी वृक्ष भेट द्यावेत. हे रोपटे संबंधित व्यक्तीच्या नावाने लावून त्याचे संवर्धन केल्यास शहराचे पर्यावरण नक्कीच सुधारेल,” असे प्रतिपादन सांगोला नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांनी केले.

जुना मेडशिंगी रोड, स्पंदन हॉस्पिटल परिसर येथे समर्थ नगर मित्र मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. याच सोहळ्यात मेजर मनोहर राऊत यांचा वाढदिवस आणि दत्तात्रय घाडगे यांचा विवाह वर्धापन दिन असा तिहेरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विलास पाटील सर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना आनंद माने यांनी वॉर्ड क्रमांक ३ आणि समर्थ नगरच्या जनतेचे आभार मानले. शिवसेनेचे नगराध्यक्ष व दोन नगरसेवक अशा तिन्ही उमेदवारांना निवडून देऊन या विभागाने जो विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. परिसरातील रस्ते, पाणी आणि महिलांसाठी स्वतंत्र ‘महिला सभागृह’ या प्रश्नांवर प्राधान्याने तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मेजर मनोहर राऊत यांचा त्यांच्या ‘फौजी मित्र मंडळा’ तर्फे करण्यात आलेला विशेष सत्कार. या सोहळ्याला सुभाष दिघे सर, हरिबा घोडके सर, दत्तात्रय बनसोडे, पोपटराव घोंगडे, देवदत्त केदार सर, बंडोपंत लेंडवे सर, ॲड. विद्याधर भोसेकर यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समर्थ नगर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here