घेरडी गावचे रहिवाशी असलेले स्वप्नील जगधने व त्यांच्या परिवारा यांच्या वतीने दिवाळी पाढव्या निमित्त. घेरडी येथील छ शिवाजी राजे सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परीक्षेची पुस्तके व संविधान प्रत भेट दिली.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात आपल्या गावचे पण तरुण मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे यासाठी स्वप्नील जगधने कुटूंबानी विचार केला व घेरडी येथील असे ठिकाण जेथे तरुण वर्ग जास्त वेळ वाचनासाठी असतात ते म्हणजे छ.शिवाजीराजे सार्वजनिक वाचनालय घेरडी येथे असतात त्यामुळे या वाचल्यास या कुटूंबाकडून दिवाळी भेट म्हणून स्पर्धा परीक्षेची पुस्तके व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण रहावी व संविधान तरुणांच्या लक्षात रहावे म्हणून संविधान प्रत भेट या वाचनालयास देण्यात आले.
याप्रसंगी विजय लांडगे सर, विलास जगधने सर, वाचलयाचे सचिव तुकाराम औताडे सर, विनायक गंगणे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर गेजगे, तानाजी लांडगे, सोपान माने तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल शशिकांत कोळी., स्वप्नील जगधने आदी उपस्थितीत होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक