सुवर्णपदक विजेती सोमती कोडग हिचा आपुलकी प्रतिष्ठानकडून सत्कार!

0

सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने रिले रनिंग मध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या कु. सोमती कोडग हिचा सोमवारी सत्कार करण्यात आला.

आलेगाव येथील रहिवाशी व सध्या नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक असलेले श्री.रामचंद्र कोडग यांची कन्या कु. सोमती कोडग हिने ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४ मध्ये (१७ वर्षाखालील) स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये सोमती कोडग आणि महाराष्ट्र टीम ने ४*४०० मीटर रिले रनिंग मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठान कडून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सोमतीचे वडील रामचंद्र कोडग, आई सौ. विद्या कोडग, आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, अजयकुमार बाबर, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, अरविंद डोंबे, अरविंद केदार, राहुल टकले, दीपक शिनगारे, चंद्रशेखर कवडे, दादा खडतरे, सोमनाथ माळी, महादेव दिवटे,सोमनाथ सपाटे,  संतोष भोसले, अच्युत फुले, रविंद्र कदम, निलकंठ लिंगे,अतुल वाघमोडे आदी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here