सांगोला/प्रतिनिधी :डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीमधील ५०० युवक-युवतींसाठी विविध व्यवसायिक कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना निवासी व अनिवासी स्वरूपात मोफत प्रशिक्षणाबरोबरच नोकरीची हमी देण्यात येणार असल्याची माहिती प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे सांगोला तालुका समन्वयक बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.

या उपक्रमाअंतर्गत ऑटोमोटिव्ह, ब्युटी थेरपी, सीएनसी मशीन ऑपरेटर, हलके वाहन चालक, इलेक्ट्रिशियन, जीडीए, हॉस्पिटॅलिटी, मेशन कन्स्ट्रक्शन, प्लंबिंग, सौर ऊर्जा, शिलाई मशीन ऑपरेटर, टॅली, ग्राफिक डिझाईन, वेल्डिंग इ. असे एकूण १९ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रशिक्षण कालावधी ३० ते ६० दिवसांचा असून, पात्रतेनुसार ५वी पास ते १२वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
विशेष बाब म्हणजे सर्व प्रशिक्षण विनामूल्य असून उमेदवारांना फक्त गणवेश, किट व भोजनासाठी रु. १२००/- शुल्क भरावे लागेल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना बार्टीमार्फत दरमहा ४००० ते ६००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.प्रशिक्षणानंतर उमेदवारांना रोजगाराची हमी दिली जाणार असून, कोर्सदरम्यान कौशल्य व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन,अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन व आधुनिक सुविधा उपलब्ध राहतील.

प्रशिक्षण केंद्रे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, पुणे, रायगड, कोल्हापूर, यवतमाळ, मुंबई, चंद्रपूर आदी ठिकाणी ही केंद्रे सुरू असून, प्रत्येक कोर्समध्ये मर्यादित ३० जागा उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, अधिवास दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादींच्या स्व-साक्षांकित प्रती सादर कराव्या लागतील. उमेदवारांनी प्रवेशासाठी दिलेला टठ कोड स्कॅन करून किंवा गुगल फॉर्म भरून आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर: १८०० १२००० ४००७

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



