शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २२ वा हप्ता जमा; ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला लाभ

0

देशभरातील करोडो शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधून ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM-Kisan) योजनेचा २२ वा हप्ता जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ऐन हंगामाच्या काळात देशातील ९.३२ कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

पंतप्रधानांनी एका क्लिकवर देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८,६४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) वितरित केली आहे. यापूर्वी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तामिळनाडूमधून २१ वा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आता २२ व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

एकाच वेळी ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जात असल्याने, तांत्रिक कारणांमुळे किंवा बँकिंग प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास थोडा विलंब होऊ शकतो. “जर तुमच्या खात्यात अद्याप मेसेज आला नसेल, तर काही काळ प्रतीक्षा करा, लवकरच ही रक्कम जमा होईल,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तुमच्या खात्यात पैसे आले का? तपासा ‘स्टेटस’

 सर्वात आधी pmkisan.gov.in या पोर्टलवर जा. होमपेजवरील ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा. ‘Get Data’ वर क्लिक करताच तुम्हाला २२ व्या हप्त्याची सविस्तर माहिती दिसेल.

शेतकरी आपल्या बँकेत जाऊन किंवा मोबाईल बँकिंग/SMS द्वारे खात्यातील शिल्लक तपासून खात्री करू शकतात.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here