यशवंत हायस्कूलला सिंगापूर येथील पर्यटक-अभ्यास मंडळाची सदिच्छा भेट

0

यशवंत हायस्कूल चा माजी विद्यार्थी महेश पवार हा सिंगापुर येथे मोठ्या कंपनीमध्ये मुख्य इंजिनियर / अधिकारी म्हणून कार्यरत असून त्याचे सिंगापूर येथील आठ सहकारी यांनी त्याच्या समवेत यशवंत हायस्कूलला भेट दिली व त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक एक परिक्षा पॅड व पेन भेट दिली तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला आणि शाळेला विशेष भेटवस्तू घेण्यासाठी रोख रुपये २५००० /-दिले.

विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पवार सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद, प्रगतशील बागायतदार आबासाहेब बंडगर, सरपंच बाळासो बंडगर, ग्रामसेवक (माजी विद्यार्थी) राजू ताठे, डॉ. समीर मुलाणी, श्री पारेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते सुत्रसंचालन बनसोडे सर यांनी केले व आभार खंडकर सर यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here