सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांच्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

0

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातही गुलेन बॅरे सिंड्रोमचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांना गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन केले.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 5 संशयित रुग्ण आहेत. त्यातले चार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चार रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले की, GBS आजार हा संसर्गजन्य नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. GBS मध्ये दुषित पेशी ह्या नर्व्हस सिस्टीमवर अटॅक करतात. जुलाब आणि उलट्या झाल्याने पायातील शक्ती गेली तर ही त्याची लक्षण आहेत. सर्दी-पडसं झाल्यानंतर हात पायातील शक्ती जाऊन गिळायला त्रास होणे आणि दम लागणे, हातापायाला मुंग्या येतात, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. अशी लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषध घेऊ नका, असा सल्लाही डॉ. ठाकूर यांनी दिला.

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी या आजाराच्या औषधंसाठी 2 कोटी रुपयांचा मंजूर केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ज्यांचे वय जास्त आणि बीपी अनियंत्रित आहे अशा लोकांना जीबीएस सिंड्रोमचा धोका जास्त आहे. रुग्णासाठी उपचारामध्ये फिजिओथेरपीचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या या आजाराच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डची गरज नाही. पण आम्ही 10 व्हेंटिलेटर हे मोठ्यांसाठी आणि 5 व्हेंटिलेटर हे लहान मुलासाठी राखीव ठेवले आहेत. सध्या बाहेरचं खाऊ नका, चांगलं फिल्टर पाणी प्या. शासकीय रुग्णालयात सर्व उपचार उपलब्ध आहेत, असे सिव्हिल सर्जन डॉ, सुहास माने यांनी सांगितले.

 

हा असंसर्गजन्य रोग आहे. कोविडसारखा संसर्गजन्य नाही. अन्न व्यवस्थित शिजवून खा. प्लाज्मा आणि इम्यूनोग्लोबुलिनची गरज पडल्यास सिव्हिल हॉस्पिटलला पेशन्ट आणलं जाईल. हा आजार काय नवीन नाही, आम्ही शिकत असताना देखील होते. जिल्हाधिकाऱ्यांनी औषधं खरेदीसाठी डीपीडीसीमधून पैसे दिलेत. महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार होतील. घाबरून जाऊ नका, यंत्रणा जे सूचना देईल ते पालन करा.

जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या सूचना

* हा आजार असंसर्गजन्य आहे

* पाणी उकळून प्या, अन्न शिजवून खा , स्वछता पाला

* लक्षणे दिसल्यास स्वतःहून मेडिकलला जाऊन औषध घेऊ नका

* औषधांसाठी आमच्याकडे निधी पुरेसा आहे, आता दोन कोटी दिलेत गरज पडल्यास अजून दिले जातील.

* दोन दिवसात घरी जाऊन सर्वेक्षण केले जाईल

* GBS आजाराची लक्षणं असलेले रुग्ण आल्यास सिव्हिल आणि महापालिकेला कळवण्याचा सूचना खासगी रुग्णालयांना आज दिल्या जातील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here