अभिनव पब्लिक स्कूल,अजनाळे येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.काही विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध गीत, कविता आणि भाषणांच्या माध्यमातून गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मनोगतातून गुरू हे केवळ शिक्षण देणारे नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे असतात, हे वारंवार ऐकायला मिळाले.
संस्थाध्यक्ष लाडे सर यांनी आपल्या भाषणात गुरूंविषयी आदर व्यक्त करत शिक्षकांचे मनापासून आभार मानले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत गुरुदक्षिणा ही फक्त वस्तू नसून स्वतःच्या अभ्यासात प्रगती करून, चांगले गुण मिळवणे हाच खरा गुरूंचा सन्मान आहे, असे सांगितले व मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी गुरूचे स्थान किती महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला, तरशशिकांत कोळी सर यांनी गुरूच्या भूमिकेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात प्रगती करत उत्तम गुण मिळवावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही दिले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.गुरूच्या पावलावर चालून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे, हाच खरा गुरुपौर्णिमेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक