काश्मीर येथील हल्ल्यातील दहशतवाद्यांना फाशी द्या आणि पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या अडून हिंदूंचा नरसंहार, राष्ट्रपती राजवट लागू करा

0

सांगोला येथे शहीद अशोक कामटे संघटना आणि हिंदू जनजागृती समितीच्या यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

सांगोला (प्रतिनिधी): काश्मीर येथील हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडून तात्काळ फाशी द्या तसेच भारतीय राज्यघटनेतील मूल्यांप्रमाणे प्रत्येक नागरिकाला समानता, व्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे परंतु आज पश्चिम बंगाल राज्यांमध्ये ही घटनात्मक मूल्ये पायदळी तुडवली जात असून तेथील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः हिंदू समाजावर पद्धतशीर नियोजित व हिंसक स्वरूपाचे अत्याचार होत आहेत. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार तेथील नियोजित हिंसाचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी आणि कुचकामी ठरली आहे. यासाठी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, अशा मागणीचे निवेदन शहीद अशोक कामटे संघटना आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या नावे तहसीलदार यांना देण्यात आले.

हे निवेदन निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी स्वीकारले. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1. पश्चिम बंगाल राज्यात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी.
2. मुर्शिदाबाद सह राज्यभरात सुरू असलेल्या हिंसाचाराची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे कडून किंवा केंद्रीय अन्वेषण विभाग मार्फत चौकशी करण्यात यावी.
3. हिंदूंवरील अत्याचारात सहभागी असलेल्या पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
4. ज्या हिंदू कुटुंबांचे घर, व्यवसाय, मंदिर उध्वस्त झाले आहेत त्यांचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे.
5. पीडित महिलांच्या तक्रारीची तातडीने चौकशी करून गुन्हेगारांना अटक करण्यात यावी.
6. राज्यातील हिंदू भागांमध्ये लष्करी किंवा अर्ध लष्करी सुरक्षा दल तैनात करण्यात यावे.
7. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग महिला आयोग आणि बालहक्क आयोग यांची संयुक्त विषय समिती घटनास्थळी पाठवण्यात यावी.
8. काश्मीर येथील हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडून तात्काळ फाशी द्या.
निवेदन देतेवेळी निलकंठ शिंदे सर, रवींद्र कुलकर्णी, अरविंद केदार, श्रीकांत देशपांडे, सुखानंद हळीसागर, श्रीकांत चव्हाण, विकास गावडे, गणपत पटेल, गोरख माने, मयूर ढोले, मुकुंद हजारे, मकरंद पाटील, अजय तेली, श्रेयस तोडकरी, संतोष पाटणे, प्रद्युम्न कांबळे, नवनाथ कावळे, गजानन खडतरे, सोमनाथ सुरवसे, प्रा. प्रसाद खडतरे आदी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here