मतदान होण्याअगोदरच सर्वसामान्यांवर दादागिरीची भाषा; मतदानानंतर काय होणार ?

0

गावभेट दौऱ्यात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली चिंता

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सांगोल्यात सुरू असताना मतदान होण्याअगोदरच सध्या सांगोल्यात ठराविक उमेदवारालाच मतदान केले पाहिजे, अशी दंडेलशाही व दादागिरीची भाषा वापरली जात आहे. स्व. आबासाहेबांनी सर्वसामान्य जनतेने सुखाने आनंदाने आणि भयमुक्त जीवन जगण्यासाठी फार मोठे कष्ट केले असून दमदाटीचे राजकारण गेल्या ६० वर्षात कधीही घडले नाही. या पुढील काळातही दमदाटी, गुंडगिरीचे राजकारण होणार नाही याची दक्षता मी पुरेपूर घेणार असून कोणाच्याही केसाला सुद्धा हात लावू देणार नाही, असा विश्वास देत निवडणुकी अगोदरच सांगोल्यात दंडेलशाही, व दंडेलशाही दमदाटी की जात आहे तर निवडणुकीनंतर काय परिस्थिती असेल ? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी गाव भेटीदरम्यान उपस्थित करून सध्याच्या चुकीच्या व घाणेरड्या राजकारणावर चिंता व्यक्त केली.

सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवार (दि.८) रोजी डोंगरगाव, गळवेवाडी, आगलावेवाडी, भोपसेवाडी येथे गाव भेट दौरा संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख बोलत होते.

 

पुढे बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सांगोल्यातील दोघांनी टक्केवारी घेऊन स्वतःचा विकास केला. स्वतःचा विकास करत असताना गोरगरीब, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. गेल्या ५ वर्षात अनेक चुकीच्या गोष्टी राबवल्या, त्याचप्रमाणे अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला गेला. त्यामुळे तरुण वर्ग देशोधडीला लागला असून भरकटला गेला आहे. स्व. आबांनी पुरोगामी विचार जपला, निष्ठेने काम केले, त्याचप्रमाणे वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यामुळे स्वाभिमानी विचारासाठी शेतकरी कामगार पक्षाला मतदान करणे गरजेचे आहे. स्व. आबासाहेब हे अधिवेशनाअगोदर प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेत होते. आणि त्यानंतर अधिवेशनात प्रश्न मांडून निकाली काढायचे. आताची परिस्थिती मात्र वेगळी असून

 

विकासाच्या गप्पा मारणारे लोक गोरगरीब, दिनदलित, शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी किती वेळा गावात आले याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. ज्या राजकारणी लोकांना गोरगरीब, दिनदलीत, कष्टकरी नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ नाही किंवा गोरगरिबांच्या अडचणीचे जाण नाही अशा लोकांना का मतदान करायचे असा सवाल उपस्थित करून गोरगरीब दिनदलित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी माझ्या शिटी या चिन्हा समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

 

शिट्टी चिन्हं मिळाल्यापासून तालुक्यात सर्वत्र शिट्टीचा आवाज घुमू लागला आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध नागरिकांकडे शिट्टी दिसून येत असून शिट्टीचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमू लागल्यामुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे सर्वसामान्यांवर दादागिरीची भाषा केली जात आहे. दादागिरी ची भाषा २३ नोव्हेंबर पर्यंत मात्र दादागिरी, दंडेलशाहीची भाषा पूर्णपणे बंद होईल.

– डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here