✒️ सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती
▪️राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते; विरोधकांची १४ मते फुटली
✒️ सियाचीनमध्ये हिमस्खलनात लष्करातील ३ जवान शहीद
▪️अनेक जण ढिगाऱ्याखाली; मदतकार्य सुरू
✒️ नेपाळमध्ये आगडोंब
▪️संसद, राष्ट्रपती भवन आणि मंत्र्यांची घरे जाळली
✒️ राष्ट्रपती, राज्यपाल केवळ नामधारी प्रमुख
▪️कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडले मतः त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणे बंधनकारक
✒️ सरकारने मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ दबावाखाली काढला
▪️भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना ८ पानी निवेदन
▪️ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये!
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान उपग्रहांनी अहोरात्र केले काम
▪️’इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती
✒️ शेतकऱ्यांच्या खात्यात १,८९२.६१ कोटी
▪️’नमो शेतकरी योजने’चे पैसे जमा फडणवीसांच्या हस्ते सातवा हप्ता वितरित

✒️ राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
▪️उपसा जलसिंचन योजनेतील वीज दरात सवलत कायम
▪️वीज बिलात सवलत मार्च २०२७ पर्यंत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
✒️ नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका
▪️न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
▪️स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी
✒️ पंजाबला १६०० कोटींचे अर्थसाह्य
▪️हिमाचलसाठी १५०० कोटींचे पॅकेज
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
✒️ तालिबानी नेत्यांना भारतात येण्यास संयुक्त राष्ट्रांनी परवानगी नाकारली
✒️ रशियन तेल खरेदीबाबत भारताच्या भूमिकेला इस्रायलचा पाठिंबा
✒️ शेवट चांगला होणार नाही !
▪️ट्रम्प यांच्या सल्लागाराचा भारताला इशारा

✒️ भारताची आज यूएईशी सलामी !
▪️सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज
✒️ विश्वचषकासाठी पाच शहरांचा विचार
▪️भारतात रंगणारी स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत आयोजित केली जाण्याची शक्यता
✒️ मंडल अधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालय बांधण्यासाठी निधी मिळावा
▪️आमदार भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी
✒️ गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग्यश्री विजापुरे व प्रणिती पवार प्रथम
✒️ स्त्रिया सर्वच क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करत आहेतः डॉ. निकिताताई देशमुख
▪️घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
✒️ डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणीची शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभा
✒️ सांगोला तालुका शिवसेना कामगार सेनेच्या तालुका अध्यक्षपदी नवनाथ ऐवळे तर संपर्कप्रमुखपदी चंद्रशेखर केंगार सहसंपर्क प्रमुख पदी स्वप्नील करडे यांची निवड
▪️शिवसेना सोशल मीडिया शहर प्रमुख पदी प्रवीण शिवपूजे यांची निवड
✒️ वंचीत बहुजन आघाडीचे युथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर साहेब रविवार १४ सप्टेंबररोजी सांगोल्यात : विनोदभैय्या उबाळे
✒️ ज्येष्ठ नागरिकांना दरमहा रु.७०००/- सन्मानधन मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री यांना सांगोल्यातून ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म पाठवणार : नवनाथभाऊ पवार
▪️समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पहिले पाऊल ज्येष्ठांसाठी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



