ठळक बातम्या – 12/07/2025

0

✒️ शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’ च्या जागतिक वारसास्थळ यादीत

▪️१२ किल्ल्यांचा समावेश

✒️ जनसुरक्षा विधेयक विरोध डावलून मंजूर

▪️विरोधी पक्षाचे सभापतींना असहमती पत्र विरोधकांचा सभात्याग

✒️ शिंदे सेनेचे पंख कापले

▪️५०० कोटीवरील पायाभूत प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी अनिवार्य

✒️ मंत्री शिरसाटही वादाच्या भोवऱ्यात

▪️खोलीत पैशांच्या बॅगा, कथित व्हिडीओ व्हायरल

✒️ संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा

✒️ वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार

✒️ भारताचे पाकिस्तानने नुकसान केल्याचे एक छायाचित्र दाखवा !

▪️अजित डोवालांचे विदेशी मीडियाला आव्हान

✒️ मुंबई भोंगेमुक्त

▪️मुंबईतील धार्मिक स्थळांवरील १,६०८ भोंगे हटवले

✒️ आदिवासींबाबत असंवेदनशीलता

▪️विरोधी पक्षनेते दानवेंचा सरकारवर घणाघात

▪️आठ वर्षांत ११ हजार ४२ आदिवासी बालकांचा मृत्यू

✒️ ७५ टक्के मंत्री गैरहजर, अशासकीय विधेयक आणा

▪️भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा सभागृहात संताप

✒️ आठ पोलिसांमार्फत सुषमा अंधारे यांना हक्कभंग नोटीस

▪️सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा अनिल परब यांचा आरोप

✒️ दुबेला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ !

▪️मराठी अस्मितेशी तोडजोड नाही

▪️शंभूराज देसाई यांचा पुनरुच्चार

✒️ अजित पवारांची माफी मागा !

▪️लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस

✒️ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

✒️ निवडणूक आयोग भाजपसाठी काम करीत आहे- राहुल गांधी

✒️ शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच

▪️मंत्री उदय सामंत यांची माहिती

✒️ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ

▪️शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याचीही दर्शविली तयारी संजय राऊत

✒️ सेन्सेक्स ६९० अंकांनी गडगडला

✒️ बुमराचा बोलबाला, पण तळाचा तडाखा

▪️७ बाद २७१ वरून इंग्लंडची ३८७ धावांपर्यंत मजल रूटचे शतक स्मिथ, कार्सचीही झुंज

✒️ क्रिकेट दौरा म्हणजे कौटुंबिक सहल नव्हे !

▪️बीसीसीआयच्या नियमाला गंभीरचा पाठिंबा

✒️ आम.डॉ. बाबासाहेबांमध्ये स्व. गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणेच तळमळ

▪️विधानसभेत कंत्राटी कामगारांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नावर उठविला आवाज

✒️ सांगोला तालुक्यातील युवा उद्योजकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा-अॅड. गजानन भाकरे

✒️ सत्य साई संघटनेच्यावतीने मेडशिंगी येथे विद्यार्थ्यांना १००० वह्यांचे वाटप

✒️ कोळे येथे रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची जयघोषात मिरवणूक उत्साहात संपन्न

▪️महास्वामीच्या मठात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

✒️ शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिरचा एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर १६ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले

✒️ गरजू महिलेस उदरनिर्वाहासाठी आपुलकी प्रतिष्ठानकडून शिलाई मशीन भेट

✒️ सांगोला येथील ट्रॉमा केअर सेंटर लवकरात लवकर कार्यान्वित करावे

▪️आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

✒️ १५ जुलै रोजी ७६ ग्रामपंचायतीसाठी नव्याने आरक्षण जाहीर होणार

✒️ युवा नेते डॉ. परेश खंडागळे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा

▪️वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत शस्त्रक्रिया मध्ये १०० सर्जरी तर १० जुलै रोजी एकाच दिवशी ५५ रुग्णांची आरोग्य तपासणी व उपचार

▪️५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान; प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोशल मीडियावरून डॉ. परेश खंडागळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

✒️ सांगोला मार्केट यार्ड येथील डाळिंब बाजार झाला लाल भडक ; सांगोला डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाची आवक वाढली

▪️डाळिंबाच्या खरेदी विक्रीतून दररोज ३५ ते ४० लाख रुपये पर्यंत आर्थिक उलाढाल

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here