ठळक बातम्या – 25/07/2025

0

✒️ भारत-ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार

▪️करारामुळे ९९ टक्के भारतीय मालाला टॅरिफमधून मिळणार सवलत

✒️ फडणवीस यांच्या विरोधात ‘जेएनयू’त निदर्शने

▪️अध्यासन केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला विरोधाचे गालबोट

✒️ सर्पमित्रांना लवकरच ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा

▪️ओळखपत्रासह १० लाखांचा अपघात विमा

✒️ भारतातून नोकरभरती करू नका !

▪️ट्रम्प यांचा अमेरिकन टेक कंपन्यांना इशारा

✒️ निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

▪️मुंबई बॉम्बस्फोट खटला

▪️सुटका झालेले आरोपी तुरुंगाबाहेरच राहणार

✒️ गणेश विसर्जनाचा तिढा सुटला

▪️सहा फुटांपर्यंत गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात

✒️ भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी केली चर्चा

▪️५० हून अधिक मौलाना, अभ्यासक सहभागी

✒️ एअर इंडियाचे ११२ वैमानिक रजेवर

✒️ रशियन विमान कोसळून ४९ ठार

✒️ संसदेत बिहारवरून गदारोळ सुरूच

✒️ लेखी हमी मिळाल्यानंतर परिचारिकांचा राज्यव्यापी संप मागे

✒️ दीड लाख ‘गोविंदां’ना सरकारचे विमा संरक्षण

▪️मृत्यू झाल्यास १० लाखांची भरपाई

✒️ देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भान ठेवून बोला

▪️अजित पवार यांच्याकडून मंत्री, आमदारांची कानउघाडणी

✒️ ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द हटवण्याचा विचार नाही

▪️केंद्र सरकारची माहिती

✒️ कर्नाटकात निवडणूक आयोगाने केली फसवणूक, काँग्रेसकडे पुरावे

▪️विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा

✒️ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्र्यांचा अंकुश

▪️मोठ्या निधीसाठी लागणार मुख्यमंत्र्यांची परवानगी

✒️ पुण्यात ग्रोथ हब उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

✒️ अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर ईडीचे छापे

▪️मुंबईतील ५० कंपन्यांच्या ३५ हून अधिक ठिकाणी आणि २५ जणांवर धाडी ३,००० कोटी रुपयांचे बँक कर्ज फसवणूक प्रकरण

✒️ पंतच्या शौर्यानंतरही पिछाडी !

▪️भारताचा डाव ३५८ धावांत संपुष्टात; इंग्लंडचे शतकी सलामीसह प्रत्युत्तर

✒️ हम्पीची अंतिम फेरीत धडक; कैंडिडेट्स स्पर्धेसाठीही पात्र !

▪️महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा

✒️ भारत-पाकिस्तानमधील लढतीबाबत संभ्रम कायम

▪️यंदाची आशिया चषक स्पर्धा अमिरातीत; बीसीसीआयचा निर्णय

✒️ १७ वर्षीय उन्नतीचा सिंधूला पराभवाचा धक्का

▪️सात्विक-चिरागचा उपांत्य फेरीत प्रवेश; लक्ष्य, प्रणॉय यांच्याकडून मात्र पुन्हा निराशा

▪️चीन ओपन बेडमिंटन स्पर्धा

✒️ लहुजी पँथर सेनेचा सांगोला तहसील कार्यालयावर विराट मोर्चा

▪️विविध मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन

✒️ इनरव्हील क्लब सांगोलाने पटकावला डिस्ट्रिक्ट असेम्ब्लीत बेस्ट क्लब व बेस्ट प्रेसिडेंटचा बहुमान

✒️ चोपडी येथे संत नामदेव महाराज समाधी संजीवन सोहळा संपन्न

✒️ तहसीलदार व पोलीस निरीक्षक मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

▪️मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी लहुजी पँथर सेनचा सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा संपन्न

✒️ प्रहार संघटनेच्या वतीने शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी सांगोला-वासूद चौक येथे चक्काजाम आंदोलन संपन्न

▪️आंदोलनादरम्यान आम. डॉ. बाबासाहेव देशमुख यांची भेट प्रहार संघटनेस दिला पाठिंबा

✒️ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगोला बस स्थानकास दिली भेट

▪️विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी पर्यावरण व छेडछाड विषयावर केली चर्चा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here