ठळक बातम्या – 27/07/2025

0

✒️ हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे

▪️आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले

▪️उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

▪️सरकार, पालकमंत्री झोपा काढत होते का? – हर्षवर्धन सपकाळ

✒️ महायुतीत बेबनाव

▪️संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

✒️ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरच्या धडकेत १ ठार

▪️२० गाड्यांचे नुकसान; १८ जण गंभीर

✒️ मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

✒️ मुंबईसह राज्याला पावसाने झोडपले

✒️ लष्कराचे आधुनिकीकरण; रुद्र ब्रिगेड, भैरव युनिट्सची स्थापना

▪️कारगिल विजय दिवसानिमित्त सरसेनानी उपेंद्र द्विवेदी यांची माहिती

✒️ शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक

▪️केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

✒️ अवकाळीचा ४ लाख शेतकऱ्यांना फटका

▪️शेतपिकांच्या नुकसानीपोटी ३७७ कोटींचा निधी मंजूर

✒️ लाडक्या बहिणींचे पैसे वसूल करणार !

▪️१४ हजार पुरुषांवर कारवाईचे अजित पवारांनी केले सूतोवाच

✒️ अकरावी प्रवेशाचे अधिकार महाविद्यालयांना द्यावेत

▪️महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची मागणी

✒️ महायुतीमधील ७५ टक्के मंत्री बिनकामाचे

▪️संजय राऊत यांचा घणाघात

✒️ इराणमध्ये दहशतवादी हल्ला : ८ ठार, १३ जखमी

✒️ माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे – खा.सुप्रिया सुळे

✒️ धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद ?

▪️मनोज जरांगे यांचा फडणवीस, पवारांवर हल्लाबोल

▪️मुंडेंना विरोध करू -सुप्रिया सुळे

✒️ राज्यात ‘कारगिल विजय दिवस’ उत्साहात साजरा

✒️ पंढरपूर येथे पूजेची ऑनलाईन नोंदणी होणार

✒️ भारताचे मालदीवला ४८५० कोटी कर्ज

✒️ पडझडीनंतर गिल-राहुलची आश्वासक भागीदारी

✒️ हम्पी-दिव्या यांच्यातील पहिला डाव बरोबरीत

✒️ साहिल जाधवचा सुवर्णवेध

▪️विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धा

✒️ आशिया कप ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान यूएईत

▪️भारत-पाक लढत १४ आणि २१ सप्टेंबर रोजी होण्याचा शक्यता

✒️ फॅबटेक मधील विद्या आलदर यांची बृहन्मुंबई महापालिकेत दुय्यम अभियंता पदी निवड

✒️ सोनंद येथे कारगिल विजय दिवस साजरा

✒️ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये २५ जुलै रोजी ३ हजार ४७९ क्रेटची आवक

▪️एकूण १९ लाख ५० हजार ११२ रुपयांची आर्थिक उलाढाल

▪️सोमनाथ चोरमले यांच्या डाळिंबाला २०० रुपये प्रति किलो मिळाला भाव

✒️ आरसीएमएस संदर्भातील अडचणीबाबत तहसील कार्यालयातील सांगोला पुरवठा अधिकारी यांचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र

✒️ चिंचोली रोडवरील अनधिकृत डाळिंब व्यवहार कधी होणार बंद ? कठोर कारवाईची मागणी

✒️ बहुरूपी समाज शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट

✒️ अकलूज येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्राची मागणी

▪️खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी

✒️ सांगोलातील नामांकित शाळांच्या बसचे घडले दोन अपघात

▪️विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला गंभीर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here