ठळक बातम्या – 30/08/2025

0

✒️ मराठा वादळाने मुंबईला हादरा

▪️आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार

✒️ मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी

▪️मुंबई झाली भगवीमय

▪️आझाद मैदान परिसरातील शौचालये, दुकाने, हॉटेल बंद

▪️पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

✒️ तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार – मनोज जरांगे

▪️मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा-सदावर्ते

✒️ आंदोलनाच्या नावाखाली पोळी भाजू नका, तोंड भाजेल -फडणवीस

✒️ मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

✒️ जे देणे शक्य आहे ते नियमांत बसवून देणार – एकनाथ शिंदे

✒️ भारत-चीनने एकत्रित काम करणे गरजेचे – मोदी

✒️ जपान भारतात ६० हजार कोटींची गुंतवणूक करणार

▪️दोन्ही देशात संरक्षण व आर्थिक भागीदारीचे करार

✒️ आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद

▪️आंदोलकांची झाली गैरसोय; सोबत १५ दिवसांची शिदोरी…

✒️ मराठा आरक्षण देऊ शकत नसाल तर सत्तेतून बाहेर पडा

▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा हल्लाबोल

✒️ ज्यांनी पक्ष फोडला, पक्ष चोरला तेच मत मागताहेत

▪️उद्धव ठाकरेंची फडणवीस यांच्यावर सडकून टीका

▪️उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी मातोश्रीवर

✒️ महाराष्ट्राची परकीय गुंतवणुकीत घोडदौड सुरूच

▪️३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार रोजगार, विविध कंपन्यांशी १७ सामंजस्य करार

✒️ ‘ते’ उपराष्ट्रपतीपदाला कोणती प्रतिष्ठा आणणार ? – शरद पवार

✒️ संधी मिळाल्यास संविधानाचे रक्षण करणार – बी. सुदर्शन रेड्डी

✒️ जीएसटी सुधारणांमुळे राज्यांना २ लाख कोटींचा तोटा

▪️महसुली तुटीची नुकसानभरपाई द्या; विरोधी राज्यांची मागणी

✒️ जिनपिंग यांच्या गुप्त पत्रामुळे भारत-चीन कोंडी फुटली

✒️ पहिल्या तिमाहीत जीडीपी वधारून ७.८%

▪️जीडीपीचा पाच तिमाहीतील उच्चांक राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर

✒️ ६१ पैशांनी रुपया गडगडला

▪️८८.१९ सर्वकालीन नीचांकी पातळीवर

✒️ जिओचा आयपीओ पुढील वर्षी पहिल्या सहामाहीत येणार – मुकेश अंबानी

✒️ टॅरिफनंतरही भारताची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेलः पियूष गोयल

✒️ नीरजचे डायमंड पुन्हा हुकले !

▪️अंतिम फेरीत सलग तिसऱ्यांदा दुसऱ्या स्थानी; जर्मनीचा वेबर अजिंक्य

✒️ पुण्यात उभारणार देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय !

▪️राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बालेवाडी येथील आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

✒️ पाटील वस्ती सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील ५७ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार एकाच शिक्षकेवर

▪️विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे घातले साकडे; शाळेवर शिक्षक पोहचले म्हणून समजताच पालकांनी मानले आभार

✒️ शिवराजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोष्टी गल्ली सांगोला

▪️तिरुपती बालाजी रूपातील १८ फुटी श्रींची मूर्ती मंडळाचे विशेष आकर्षण

✒️ सांगोला सकल मराठा समाज यांच्या वाहन ताफ्यातील रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी रुग्णवाहिका ठरली

▪️मुंबई प्रवासादरम्यान दोन ठिकाणी अपघात; अपघातातील दुचाकी स्वरांचे वाचवले प्राण

✒️ सांगोला महाविद्यालयाचा तेजस दौडे याची सोलापूर विद्यापीठाच्या बुध्दीबळ संघात निवड

✒️ तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कोळा विद्यामंदिरचे घवघवीत यश

✒️ विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन अभ्यास करावा प्राचार्य डॉ.टी.एन. लोखंडे

▪️माणदेश महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाचा स्वागत समारंभ संपन्न

✒️ हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन : संग्राम चौक, नाझरे येथे गणपती प्रतिष्ठापना

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here