सांगोला (प्रतिनिधी) :सांगोला तालुक्यातील जवळा केंद्रा अतंर्गत डोंगरगाव उपकेंद्रातील आरोग्य सेविका ज्योती एकनाथ गालफाडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 42 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे.

सांगोला तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात त्यांनी आरोग्य सेविका म्हणून प्रामाणिकपणे रूणांची सेवा बजावली. ज्योती गालफाडे यांची नुकतीच मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे बदली झाली होती. त्यांना चार दिवसापूर्वी ताप येऊन त्रास होत असल्याने खाजगी रुग्णाला दाखल होते प्रकृती खालावल्याने सांगली येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले पण उपचार घेत असतानाच त्यांची शनिवारी सायंकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता डोंगरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


