उच्च सुरक्षा नंबर प्लेटकरिता वितरन केंद्र संख्या वाढवा : अशोक कामटे संघटना

0

सांगोला (प्रतिनिधी): संपूर्ण देशात दुचाकी व चार चाकी वाहनांकरिता उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट बसवणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे. सदरचे नंबर प्लेट मिळण्याकरता तालुका व जिल्हास्तरावर फारच बोटावर मोजण्याएवढी परिवहन विभागाने मान्यता दिलेली आहे. वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने सदरची वितरण केंद्र संख्या वाढवावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

1/4/2019 पूर्वी वाहन नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या फार मोठी आहे. तसेच राज्यातील ग्रामीण भागात याची कोणतीही जनजागृती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कोणत्याही जिल्ह्यात प्रभावीपणे केलेली नाही त्यामुळे वाहनांना नवीन अशा प्रकारचे नंबर प्लेट बसवणे याबाबत कोणतीही कल्पना व त्याचे महत्त्व माहीत नसल्याने याबाबत वाहनधारक अज्ञभिन्न आहेत , तसेच या नंबर प्लेटच्या दराबाबत देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये मोठा फरक आहे तरी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने दर कमी करावेत ,परिवहन विभागाने सदरच्या कामाची व्याप्ती व महत्व लक्षात घेता किमान दहा महिने अर्थात डिसेंबर 2025 पर्यंत वाहनधारकांना नंबर प्लेट बसविण्याकरिता मुदतवाढ मिळावी विनाकारण वाहनधारकांवर याकरिता कोणतेही दंड आकारू नयेत अशी मागणी बहुतांश वाहनधारकांनी कामटे संघटनेकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, परिवहन मंत्री, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अशोक कामटे संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

आजच्या परिस्थितीत परिवहन विभागाने रेडियम व्यावसायिकांना कोणतीही माहिती न देता परस्पर अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना टेंडर दिल्याचे दिसून येत आहे त्यामुळे इतर व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे, इतर राज्यांच्या तुलनेत दरामध्येही तफावत आहे याबाबत विचार व्हावा, राज्यातील परिवहन विभागाने किमान दहा ते पंधरा व्यावसायिकांना याबाबत ग्रामीण,शहरात रीतसर परवानगी द्यावी. याबाबतची जनजागृती करावी, तसेच किमान दहा महिने या योजनेस मुदत वाढ देणे आवश्यक आहे.

– श्री निलकंठ शिंदे सर,अध्यक्ष :- अशोक कामटे संघटना सांगोला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here