सांगोला तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी आज 06 जानेवारी 2025 पासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.सोलापूर जिल्हा तलाठी संघ सोलापूर यांनी जिल्हाधिकारी यांना दि.18/12/2024 रोजी दिलेले निवेदनानुसार खालील मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरु केले असल्याचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव व सचिव विशाल जगाते यांनी सांगितले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अतिकालिक भत्ता मिळणेबाबत. 2) लॅपटॉप व स्कॅनरसह प्रिंटर्स मिळणेबाबत. 3) साझा पुनर्रचनेनुसार साझा फोड करणेबाबत. 4) ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांची सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत. या अत्यावश्यक चार मागण्या संदर्भात निवेदन दिलेले होते. व सदर मागण्या पुढील १५ दिवसात पूर्ण कराव्यात असे सदर निवेदनामध्ये नमूद केले होते. परंतु सदर मागण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे 8/12/2024 च्या जिल्हासंघाच्या बैठकीत सर्वानुमते ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी दि.06/01/2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहे.
सांगोला तालुका तलाठी संघटना यामध्ये सहभागी झाली असल्याचे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांना तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, सचिव विशाल जगाते व तलाठी बंधू-भगिनींनी दिले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक