सांगोला (प्रतिनिधी) ७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय सांगोला येथे संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त सुभेदार मराठे यांनी ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. व देशसेवेतील अनुभव आपल्या खास शैलीत मांडले व विद्यार्थ्यांनी देशसेवेत येण्याचे आव्हान केले.एसएससी फेब्रुवारी– मार्च 2025 परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक रमेश पवार यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व , आणि विद्यार्थ्यांना शिस्त ,राष्ट्रप्रेम आणि देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.त्यानंतर यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली.
या कार्यक्रमासाठी संस्था सचिव निलकंठ शिंदे सर , संस्था कार्यकारिणी सदस्य विठ्ठलपंत शिंदे सर, संस्था सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.ध्वजारोहन निवेदन, सूत्रसंचालन एस एस कुंभार सर यांनी केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक