सांगोला तालुक्यातील केबीएन साईराम डिजीटलचे संस्थापक व प्रसिध्द उद्योगपती कैलास बाळासाहेब गोरे यांना स्व.हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशिय समाजसेवी संस्था महा.राज्य यांच्यावतीने राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान सोहळा 2024 सालामध्ये राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्व.हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशिय समाजसेवी संस्था महा.राज्य यांच्यावतीने राष्ट्रीय स्नेहबंध सन्मान सोहळा 2024 यांच्यावतीने प्रत्येक वर्षी राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संस्थेचे संस्थापक पंढरीनाथ कदम,सचिव कृष्णात गायकवाड,उपाध्यक्ष शफी शेख यांनी कैलास गोरे यांना निवडिचे पत्र दिले होते.
जेष्ठ कथालेखक योगीराज वाघमारे,सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी रघुनाथ जाधव,जेष्ट पत्रकार भरतकुमार मोरे,सिने अभिनेता किर्तीपाल गायकवाड, समाधान गाजरे,डॉ.हरिदास फाळके,अॅड.भगवानदास मुळे,बाळासाहेब शिंदे,योगेश कडाळे, दत्तात्रय सरडे,शहाजहान शेख,महादेव तळेकर,लेखक मारूती बेलभंडारे,पंढरीनाथ कदम,अमृता रनदिवे या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योगपती कैलास गोरे यांना राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गेली 20 वर्षापासून कैलास गोरे हे सोलापूर जिल्हा सांगोला शहर व तालुक्यात व जवळा परिसरात डिजीटल क्षेत्रामध्ये मोठे उद्योग उभे करून नावलौकिक केले आहे.
त्यांनी सांगोला शहरात सुध्दा मोठ्या प्रमाणावर उद्योजक,सहकार,शैक्षणिक,आरोग्य,क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजाऊन उद्योगात भर टाकली आहे त्यामुळे त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.कैलास गोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक