महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमी, पुणे आणि डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे ‘प्रगत शिक्षण पद्धती’ (Advanced Teaching Methods) या विषयावर शिक्षक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर होते.

या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांना आधुनिक अध्यापन तंत्रे, नव्या शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण प्रणालींचे प्रशिक्षण देणे हा आहे. या माध्यमातून शिक्षण प्रक्रियेतील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती तसेच डिजिटल साधनांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. मीनाक्षी कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. नामदेव शिंदे आणि प्रा. डॉ. अलका घोडके यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. अशोक लोंढे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


