सांगोला (प्रतिनिधी): शाहू महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने एकतेचा आणि समतेचा संदेश देण्यासाठी सांगोला शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून भव्य मानवी साखळी आयोजित केली जात आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील विविध संस्था, संघटना, शाळा, कॉलेज आणि संविधान संवादक यांच्या वतीने २६ जून रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले असून तालुक्यातील परिवर्तनवादी विचारांच्या संस्था, संघटना, कार्यकर्ते, शाळा कॉलेज मधील विद्यार्थी यांनी मोठ्या संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन जेष्ठ सामजिक कार्यकर्ते ललित बाबर यांनी केले आहे.
या मानवी साखळीच्या निमित्ताने समाजातील एकजूट आणि समानतेच्या प्रतीकात्मक दाखल्याने समाजात असलेल्या भेदभावाच्या रेषा पुसून टाकण्यास मदत होणार आहे. शाहू महाराज यांनी समाजातीलसर्वच वंचित आणि दुर्बल घटकांसाठी संघर्ष केला. त्यांनी समता, न्याय आणि एकतेचे मूल्य समाजात रुजवले आहे. त्यांचा वारसा जतन करत, आजच्या युगातील लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे हाच या मानवी साखळीचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सहभागी होणाऱ्या नागरिकांना, युवकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली जाईल. हे एक सामूहिक उपक्रम असून, यामध्ये जात, धर्म, भाषा या सर्व भेदांना पार करून, एकात्मतेचा संदेश दिला जाईल.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील सर्व नागरिकांना या ऐतिहासिक कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक