शिंदे सरकारने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण योजना ‘ ही योजना महिला मतदारांवर थेट प्रभाव टाकणारी आहे. याच कारणामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ही योजना थांबवण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाने ही योजना तुर्तास थांबवली आहे. शिंदे सरकारकडून महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच देण्यात आलेत. त्यामुळे आता निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यात या योजनेचं भवितव्य काय असेल? हे कळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.आतापर्यंत या योजनेत 2 कोटी 20 लाख महिलांनी लाभ घेतला होता. या महिलांच्या खात्यात आतापर्यंत 5 महिन्यांचे 7500 रूपये जमा झाले आहेत. यानंतर आता महिलांना पुढच्या हप्त्याची म्हणजेच डिसेंबरमध्ये हाती येणार निधीची उत्सुकता लागली आहे. पण राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. तसेच नवे अर्ज स्विकारणेही बंद केले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत, असे फार थोडेसे लोक राहिले आहेत. सगळ्यांचे पैसे अकाउंट मध्ये गेलेले आहेत. 98 टक्के पेक्षा जास्त आमच्या महिला भगिनींना मिळाले आहेत. ही आमची कायम स्वरूपी योजना आहे. निवडणुकीसाठी आणलेली ही योजना नाही. त्यामुळे याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे, असं भुजबळ म्हणाले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक