महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया चुकली असेल त्यांनी 31 मार्च2026 पर्यंत दुरुस्ती करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास 31 डिसेंबर 2025 ची मुदत देण्यात आली होती. त्या दरम्यान महिलांकडून काही चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं त्यांचा लाभ बंद झाला होता. आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा ई- केवायसी दुरुस्तीसाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: 31 मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!
e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.
31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिला लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया केली होती आणि ती प्रक्रिया पूर्ण करताना ज्या महिलांनी चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांच्यासाठीच ई केवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC माध्यमातून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र ती प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून “लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे” याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेल्या असल्याचे समोर आलं होतं. त्यामुळं ई – केवायसी सुधारणेची शेवटची संधी देण्यात आली आहे.

ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडणाऱ्या महिलांना सुधारणा करण्याची एक संधी देण्यात आली आहे. ही सुधारणा 31 मार्च 2026 पर्यंत करता येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



